बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता सध्या त्याच्या मुलामुळे प्रचंड चर्चेत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं शनिवारी रात्री मुंबई समुद्रातील एका क्रुझमधून आर्यनला अटक केली. या क्रूझमध्ये असताना आर्यनकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणावरुन 4 ऑक्टोबर रोजी आर्यनला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आर्यनच्या बाजूने बोलणारे प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी तब्बल अडीच तासांचा युक्तीवाद घातला.

आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते, त्याच्याकडे बोर्डींग पास देखील नव्हता, त्याला पार्टीसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, त्यामुळे तो फक्त पार्टीसाठी गेला होता, असं सतीश मानशिंदे यांनी कोर्टात म्हटलं आहे. यावेळी बोलताना आर्यनची बॅग तपासली तेव्हा त्याच्या बॅगमध्ये काहीच सापडलं नव्हतं, मात्र त्याचा मित्र अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. त्यामुळे दोन आरोपींसह अनेकांकडे चरस सापडले असून आर्यनचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं देखील मानशिंदे यांनी म्हटलं आहे.

कोर्टात आर्यनची बाजू मांडताना सतीश मानशिंदे यांनी अनेक मुद्दे मांडले. यादरम्यान, सतीश मानशिंदे आणि अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी अनिल यांनी आर्यन तिथं का गेला होता?, असा सवाल केला. यावर जर तो तिथं होता तर तो ड्रग्ज विकत होता असं होत नाही, जर त्याला ड्रग्ज विकायचेच होते, तर त्याने अख्ख जहाज विकत घेतलं असतं, असं सतीश यांनी म्हटलं.

दरम्यान, कोर्टात आर्यनने सांगितलेले मुद्दे मांडताना मी 24 वर्षांचा मुलगा आहे, ज्याच्यावर याआधी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नाही, त्यामुळे कोणाचाही गुन्हा माझ्यावर थोपवता येणार नसल्याचं आर्यनने म्हटलं असल्याचं सतीश यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More