Top News देश

“हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी गप्प का?”

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या सत्ताकाळात स्मृती इराणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायच्या. तेव्हा त्यांना बलात्कारासारखे मुद्दे गंभीर वाटायचे? परंतू आता सत्ता हातात असताना देखील त्या शांत का आहेत? तसेच त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यानाथ यांच्याकडे त्या राजीनामा का मागत नाहीत? असे अनेक सवाल त्यांना सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी गप्प का?, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जातोय. स्मृती इराणी यांचे आंदोलन करतानाचे जुने व्हिडिओ आणि ट्वीट्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका करत बलात्काऱ्यांना फाशीची देण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबरी विद्ध्वंसप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय; अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

पायल घोष प्रकरणात अनुरागला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचे आदेश

“पोलिसांनी मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”

शशी थरूर यांनी धोनीशी केलेल्या तुलनेवर संजू सॅमसन म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या