बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी ?’; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई | कोरोना रूग्णांसाठी राज्यसरकारने विविध राज्यातून ऑक्सिजन आणण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर देशातली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ऑक्सिजनचा प्रश्न सुटताना दिसत आहे. पण अद्याप रेमडेसिवीरचा प्रश्न सुटलेला दिसत नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवण्यात राजकारण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50,000 इतकी आहे. मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार राज्यात 33,000 ते 36,000 रेमडेसिवीर पुरवतं आहे. आता रेमडेसिवीर साठा केंद्र सरकारनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता मात्र महाराष्ट्राला केवळ 26,000 रेमडेसिवीर मिळणार आहेत. महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी ?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला केला आहे.

लस उत्पादन कंपन्यांना केंद्र सरकार धमकवत असल्याचा आरोप याआधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून देखील राज्यात मोठा वाद पेटला होता. तर ऑक्सिजन एक्सप्रेसला फिरवून उशीरा आणलं जात आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आरोप धक्कादायक आहे.

दरम्यान, राज्यात सध्या ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावं म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. याच मुद्द्यावरून  केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरूवात होणार असं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल”

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More