बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात लसीचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी?, परराष्ट्र मंत्री म्हणाले…

नवी दिल्ली | भारतात कोरोनाने हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आणि देशात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या. मात्र आता लसीकरणासाठी लस कमी पडू लागली आहे. भारतातील दोन लसींच्या कंपन्या असताना लसी कमी पडत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. बाहेरील देशांना लस का पुरवी जात आहे?, असा सवाल केला जात आहे. याबाबत देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी माहिती दिली आहे.

कोवॅक्स करारांतर्गत ही लस इतर देशांना पाठविण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर भारताने सही केली आहे. अनेक देशांना कमी किमतीत ही लस देणे आपल्यावर बंधनकारक होते. आपल्या शेजारील राष्ट्रांनाही या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे आपली जबाबदारी होती. शेजारील राष्ट्रांमध्येही कोरोना स्थिती नियंत्रणात रहावी हा या पाठीमागचा उद्देश असल्याचं डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

आपली आरोग्य यंत्रणा उघडी पडली आहे. हे अगदी स्पष्ट आहे की मागील 75 वर्षांमध्ये आम्ही आरोग्य क्षेत्रात कमी गुंतवणूक केली आहे. ही बाब लक्षात घेऊनच पंतप्रधानांनी आयुष्मान भारत योजना सुरू केली. कारण सध्या आपण अशा परिस्थिती पोहोचलो आहोत की आम्ही लोकांना खासगी डॉक्टरांच्या हवाली सोडू शकत नसल्याचं जयशंकर म्हणाले. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, भारतातील लस कंपन्यांनी देशातील लसीची गरज भागविण्यासाठी उत्पादन वाढवण्याची योजना आखली होती. परंतु फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता भासू लागली. त्यामुळे मार्चपासून आम्ही परराष्ट्र मंत्रालयामार्फत कच्चा माल परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात एका पाठोपाठ एक गुन्हा! बदला घेण्यासाठी रचला फिल्मी कट, पेटवली कार

‘आम्हाला नियुक्त्या द्या, आता आम्ही हताश झालोय’; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं पत्र व्हायरल

“कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नरेंद्र मोदी अपयशी आणि हतबल”

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय- नरेंद्र मोदी

हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल, महिला वेटरनं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More