बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर

मुंबई | गेल्या दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, अजूनही राज्यपालांनी यावर सही केलेली नाही. त्यामुळे नियुक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यातच आता नियुक्त्या रखडण्यामागील मुख्य कारण आता समोर येत आहे.

ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसे यांचं यादीत नाव असल्यानं राज्यपालांनी नियुक्त्या रखडल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. परंतु, या विषयावर अद्याप ठाकरे सरकारकडून कोणीही भाष्य केलेलं नाही.

एकनाथ खडसे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं ठरलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न न्यायालयात गेला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायलायने दिला होता. तर आमदारांच्या नियुक्त्या रखडणं, हे योग्य नसल्याचं मत देखील न्यायालयाने मांडलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोना इफेक्ट… HIV बाधितांच्या संख्येबाबत चांगली बातमी आली समोर

कधीकाळी होता कैदेत, आता होऊ शकतो अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष

भर सामन्यात बाचाबाची, अन् बाल्कनीत कोहली पेटला; पाहा नेमकं काय झालं?

टाटा मोटर्सचा नवा धमाका, ‘ही’ गाडी तोडू शकते मार्केटचे सर्व रेकॉर्ड्स…

“सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More