बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

सातारा | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नैसर्गिक आणि राजकीय परिपुर्णता लाभलेल्या साताऱ्यात नेहमीच राजकीय वातावरण तापलेलं असतं. आताही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेबाबत वाद पेटण्याची चिन्हं आहेत. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून स्वपक्षीय आणि विरोधक दोन्हींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा नगरपरिषदेनंतर आता सातारा जिल्हा बॅंकेवरून नेत्यांमध्ये जोरदार जुंपण्याची चिन्हं आहेत. जिल्हा बॅंक साताऱ्याची आणि निर्णय पुण्यात असं होवू देणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. कोणी सहकारी संस्था खाजगीकरण केलं?, कुणी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या?, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

उदयनराजे यांचा रोख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शिवेंद्र राजे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांच्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॅंकेच्या हिताच्या दृष्टीनं जिल्ह्यातील नेत्यांनीच बॅकेंचे निर्णय घ्यावेत, असंही उदयनराजे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बॅंक महत्वाची असल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, साताऱ्यातील कामावरून आधीच उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे. आता सातारा जिल्हा बॅंकेचा वाद नेमका कसा सुटणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“सगळे चोर आहेत, फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय?”

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More