…म्हणून मी राजीनामा देतोय; पाहा उर्जित पटेलांनी नेमकं काय कारण सांगितलं!

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळं मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे. 

रिझर्व्ह बँकेकडे असणाऱ्या राखीव निधीचा वापर करण्यावरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत वाद सुरु होते, या वादातून उर्जित पटेलांनी राजीनामा दिला, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

राजीनामा पत्रात मी गेल्या काही वर्षांपासून रिझर्व्ह बँकेत काम करु शकलो ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेतील अधिकारी, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केलं, असं उर्जित पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरु होत्या. 

महत्वाच्या बातम्या –

-अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील नेमका आहे कोण?

भाजपच्या पराभवाच्या भीतीनं शेअरबाजारात मोठे हादरे

-निकालाआधीच काँग्रेसचं सेलिब्रेशन सुरु ; लावले विजयाचे बॅनर

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला