17 तास नॉट रिचेबल का होते?, अखेर अजित पवारांनी सांगितलं कारण

पुणे | मी कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच होतो. तब्येत बरी नव्हती म्हणून औषधं घेऊन झोपलो होतो. पण मी कुठे आहे याची खात्री न करता अनेकांनी बातम्या चालवल्या. ते चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार यांनी आपली तब्येत बरी नसल्यानेच आपण नॉट रिचेबल असल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरणं जास्त झाली आणि दौरे जास्त झाले तर मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही पहिल्यापासून आहे. मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जिजाईला जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आणि शांतपणे झोपी गेलो, असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्यासोबत सात आमदार असल्याच्या चर्चाही होत्या.

अखेर अजित पवार प्रकटले आहे. एका ज्वेलरीच्या शोरूमच्या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला.

महत्त्वाच्या बातम्या-