बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !

मुंबई | भाजपला रामराम ठोकुन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे.

एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने 8 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे. समन्स व विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खडसे योग्य प्रतिसाद देत आहेत. मग त्यांना अटकेची भिती का वाटते? असा प्रश्न उच्च न्यायालयाने ईडीला विचारला आहे.

एकनाथ खडसेंनी एक याचिका दाखल करून आपल्यावर नोंदविला गेलेला इसीआयआर रद्द करणे तसेच सुनावणी होईपर्यंत तपास यंत्रणांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने द्यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. एकनाथ खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता. ईडीने घेतलेला आक्षेप अवैध असून तपास यंत्रणेचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप खडसे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले होते. सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं आहे. विशेष म्हणजे पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या सर्व व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ

शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!

“सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र”

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात यावा; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More