बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अदर पुनावालांनी मागणी केली नसताना त्यांना सुरक्षा का पुरवली- नाना पटोले

मुंबई | सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला हे सध्या परदेशात आहेत. तसेच केंद्र सरकारतर्फे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. अदर पुनावाला यांना केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकार अशी सुरक्षा कशी काय देऊ शकते आणि यामागची वास्तविकता काय आहे? हे जनतेसमोर आलं पाहिजे, असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं.

अदर पुनावाला यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा मागितली नसताना  तसेच त्यांनी केंद्र किंवा राज्याकडे सुरक्षेसाठी अर्ज केला नसताना त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जाते? असा केंद्र सरकारला सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. तसेच अदर पुनावाला हे सध्या परदेशात असताना त्यांना सुरक्षा कशाला? असा देखील प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

अदर पुनावाला यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचं नेमकं कारण काय? हे जनतेसमोर आलं पाहिजे आणि त्यासाठी केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. त्याबरोबरच, देशातील मोठ्या नेत्यांचा लसीसाठी दबाव येत असल्याचं पुनावाला यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

देशातील मोठ्या नेत्यांकडून अदर पुनावाला यांना धमक्या येत आहेत, असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांचा त्यात समावेश असणं शक्यच नाही, असं यावेळी स्पष्टीकरण देताना नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे. त्याचबरोबर रेमडेसिविर हे खुल्या बाजारात आणायला हवं होतं, ज्यामुळे काळाबाजार थांबवता आला असता. असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या –

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

“अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली”; वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

धक्कादायक! पतीचा मृतदेह दिल्लीतील हाॅटेलमध्ये पडुन; पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More