महाराष्ट्र मुंबई

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतला शिवसेनेसोबत झालेल्या खडाजंगीमुळे मुंबईत येण्यासाठी केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. मात्र यावरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्यावर त्या बोलत होत्या.

मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं?, तुमच्या आमच्यासारखा जो अ‌ॅक्ट ऑफ गॉड म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही केला तरी आपल्याला भरावाच लागतो. त्या कंगणाला करदात्यांच्या पैशातून  वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती, असा सवाल उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.

काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, इंडस्ट्रीने कित्येक जणांना त्यांचं घर, भाकर सगळं काही दिलं आहे. हे जे काही सुरु आहे ते सगळं वाईट आहे. कंगणावर बोलणंच मला गरजेचं वाटत नसल्याचं मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोलताना, बॉलिवूडमध्येच घराणेशाही नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

“आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या