बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

मुंबई | अभिनेत्री कतरिना कैफ (Katrnina Kaif)आणि विकी कौशल (Vicky Kaushal)  नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या सोशल मिडियावर त्यांच्याच लग्नाचा बोलबाला पहायला मिळत आहे. काल 9 तारखेला ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचीच हवा पहायला मिळत आहे.

विककॅट दोघांचा विवाह सोहळा राजस्थानातील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पार पडला. त्यांच्या फोटोंनी तर काही क्षणातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला पहायला मिळाला. लग्नात दोघांनीही मोगऱ्याचा हार वरमालामध्ये घातल्याचं दिसत आहे. कतरिनाने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तर विकी कौशलने पारंपरिक कुर्ता घातल्याचं दिसत आहे.

विककॅटच्या लग्नातील एका गोष्टीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ती गोष्ट म्हणजे विकीने कतरिनाला घातलेली डायमंड रिंग. चाहते त्या डायमंड रिंगविषयी चांगलीच चर्चा करत आहे.  या सुंदर अंगठीची किंमत 9800 डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार 7 लाख 40 हजार रुपये आहे.

दरम्यान, लग्नानंतर आता विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत. त्यांचे चाहतेही त्यांच्यासाठी आनंदी असल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

चहलच्या बायकोने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची COPY अन्…; पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More