बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पत्नी मारते, आपटते, चावते, न्याय द्या नाहीतर…’; नवऱ्याने दिली बायकोचीच तक्रार!

लखनऊ | लखनऊमध्ये एका घटनेनं हसावं की रडावं अशा कोड्यात टाकलं आहे. एका वैतागलेल्या पतीने न्यायालयाकडे न्यायाची मागणी केली आहे. आपल्या पत्नीने आपल्याला प्रचंड त्रास दिला असून आता आपल्याला न्याय हवा असल्याचं पतीने म्हटलं आहे.

संबंधित व्यक्ती ही उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील भदैयापुरा येथील राहिवासी आहे. त्याचं नाव बृजेश कुमार असं असून तो मजुरी करुन त्याचं आणि परिवारचं पोट भरतो. अशातच त्याने पोलीस अधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. यावेळी त्याने आपली पत्नी सतत भांडते आणि नंतर स्वतःच पोलिसांकडे तक्रार करते असं बृजेशने सांगितलं आहे.

पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस आपल्याला पोलीस ठाण्यात नेतात, त्यामुळे मजुरी कोण करणार? आणि मजुरी केली नाही तर पोट कसं भरणार?, अशी व्यथा बृजेशने व्यक्त केली आहे. एवढंच काय तर नुकतंच झालेल्या भांडणामध्ये पत्नीने त्याला मारुन, आपटुन, चावलं असल्याचं बृजेशने सांगितलं आहे.

दरम्यान, मला न्याय द्या, न्याय दिला नाही तर इथेच मरेल असंही बृजेशने म्हटलं आहे. पत्नीच्या सततच्या भांडणाला वैतागला असून ती घरातील सदस्यांसोबतही सतत भांडत असल्याचं बृजेशने पोलिसांना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अण्णा हजारेंच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

‘काही पक्षांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून…’; राऊतांचा मनसेवर निशाणा

‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कुंडलिका नदीला पूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More