देश

शहीद पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून पत्नीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस

नवी दिल्ली | शहीद कर्नल एम.एन.राय यांची पत्नी प्रियांका राय ह्या आपल्या पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेत असतानाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आपल्या पतीच्या पुतळ्यासोबत सेल्फी घेतानाचा हा भावूक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या भावनिक फोटोला नेटकऱ्यांनी अतिशय संवेदनशील अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. शहीद राय यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, 26 जानेवारी कर्नल यांना ‘सेना पदक’ने गौरवण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणचे 27 जानेवारी 2015 रोजी जम्मू-काश्मिरमधल्या त्रालमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना राय यांनी प्राणांची आहुती दिली होती.  

महत्वाच्या बातम्या-

-5 लाखांपर्यंत करमुक्ती करण्याची लोकांची मागणी पूर्ण केली- पंतप्रधान

-“गरिबांना शक्ती आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प”

तुमच्या अकार्यक्षम,अहंकारी कारभारानं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त केलं- राहुल गांधी

गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या