बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप की हैवान? पत्नीने जेवण न वाढल्याच्या रागात 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या

रायगड | रायगड येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने जेवण न दिल्याच्या रागात त्याने स्वतःच्याच 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही शनिवारी घडली आहे.

शनिवारी सुमारे 11 वाजता रायगड येथील रहिवासी धनुराम मांझी यांचा त्यांच्या पत्नीसोबत वाद पेटला. धनुराम यांनी त्यांच्या पत्नीकडे जेवण मागितलं होतं. मात्र यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना थांबायला सांगितलं. यावरुनच धनुराम यांनी त्यांच्या पत्नीसोबत वाद घातला. हा वाद नंतर प्रचंड पेटला.

जेवणावरुन झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की धनुराम याने थेट कुर्हाड हातात घेतली. यानंतर त्यांची पत्नी प्रचंड घाबरली आणि तिने घरातून पळ काढला. मात्र यावेळी धनुराम आणि त्यांची 9 महिन्यांची चिमुकली घरातच होते. पत्नी घरातून गेली तर असलेला राग काढण्यासाठी धनुराम याने त्याच्या 9 महिन्यांच्या चिमुकलीवर कुर्हाडीने वार केला.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित चिमुकलीचा जीव गेला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मायनसमध्ये जीडीपी, इंधन दरवाढ हे दोनदा निवडून दिल्यामुळे केंद्र सरकारचं रिटर्न गिफ्ट आहे”

रुसून गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केलं धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न

सुरा घेऊन चोरी करायला आलेल्या 2 चोरांवर भारी पडली एकटी महिला डाॅक्टर

ह्रदयद्रावक! कोरोनानं मृत्यू झालेल्या वडिलांच्या मृतदेहास हात लावण्यासही मुलांचा नकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More