एेकावं ते नवलच!!! गुगल मॅपवरून पतीने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं

पेरू | लोक रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. मात्र पेरू देशातील एका व्यक्तीने रस्ता शोधत असताना त्याच्या पत्नीला बॉयफ्रेन्डसोबत रंगेहात पकडलं आहे. 

आपल्या इच्छित जागेवर जाण्यासाठी पती गुगल मॅपचा वापर करत होता. ‘स्ट्रीट व्हियू’ फोटोग्राफ्स पाहताना त्याला ओळखीची प्रतीकृती दिसली. ही आपलीच पत्नी असल्याचं त्यानं बरोबर ओळखलं.

पांढरा शर्ट, ब्लॅक जिन्स घातलेली स्त्री एका बेंचवर बसली आहे. तिच्या मांडीवर एक पुरुष डोकं ठेवून झोपलेला हा फोटो आहे. पतीने पत्नीला याबाबत विचारणा केली तेव्हा तिनंही अफेअरची कबुली दिली. 

दरम्यान, आता पतीने थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगमुळे एकाची निर्घृण हत्या

-धक्कादायक! एअर इंडियाच्या चालू विमानातून एअर होस्टेस खाली पडली…

-#MeToo | महिला प्रगतीसाठी शॉर्टकट वापरतात; भाजपच्या महिला आमदाराची मुक्ताफळं

-घरपोच दारु देण्याचा कुठलाही विचार नाही; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

-आयुषमान खुरानाच्या कॅन्सरग्रस्त पत्नीलाही आला #MeToo चा धक्कादायक अनुभव