आग्रा | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे काही महिन्यांपुर्वी एक सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेला काही काळ होताच आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आणखी एक सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा बलात्कार महिलेच्या पतीसमोरच करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एक महिला तिच्या पतीसोबत माहेरी जाताना अचानक 3 जणांनी त्यांचा रस्ता आडवला आणि त्यांना जबरदस्तीने जंगलात ओढत नेलं. त्यानंतर दोघांकडे असलेले एकूण 10 हजार आणि दागिणे लुटून महिलेवर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान आरोपींनी महिलेच्या पतीची मारहाण देखील केली आहे.
आरोपींनी बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील रेकाॅर्ड केला आहे. या संपुर्ण प्रकारानंतर महिलेने एत्मादपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची शोध मोहिम चालू केली आहे. यामध्ये एका आरोपीचं नाव नामजद असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, महिलेने आणि तिच्या पतीने उत्तर प्रदेशमधील छलेसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिस अधिक्षक गुप्ता यांच्या आदेशावर अर्चना सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास केला.
थोडक्यात बातम्या-
आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई
“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”
“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.