पोटात चाकू खुपसून बायकोने केली नवऱ्याची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
मुंबई | पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. महिलेला विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.
लोकेश असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. पत्नी नेहाने लोकेशच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेहाला ताब्यात घेतलं आहे.
लोकेश आणि नेहाचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 7 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र लोकेश हा दारू पिऊन मारहाण करत असल्याने नेहा विभक्त झाली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी पुन्हा एकत्र आले होते. रविवारी रात्री एकच्या सुमारास लोकेश दारू पिऊन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद कडाक्याचं भांडण झालं. यानंतर रागाच्या भरात नेहाने लोकेशची हत्या केली, अशी माहिती विरार पोलिसांनी दिली आहे.
विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ
शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!
“सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र”
मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात यावा; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”
Comments are closed.