Top News क्राईम विदेश

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

Photo Credit- Pixabay

ब्रिटन | कोणाचं डोकं कोणत्या गोष्टीवरुन सटकेल हे सांगण सध्याच्या जगात अवघड झालं आहे. अशाच प्रकारे ब्रिटनमध्ये आयपॅडच्या चार्जरसाठी एका महिलेने आपल्या पतीची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्रिटनमधील रिटायर्ड चार्टर्ड अकाऊंटंट पेनेलॉप जॅक्सनने आपल्या चौथ्या पतीची एका आयपॅड चार्जरसाठी हत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव डेविड जॅक्सन असून त्याचं वय 78 वर्षे आहे.

डेविड जॅक्सन आणि पेनेलॉप जॅक्सनचा जावई जेरेमी मुलिंस यांनी हत्या करणारी महिला पेनेलॉप जॅक्सनविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. हा सगळा प्रकार घडत असताना डेविड आणि पेनेलॉप आपल्या किचन मध्ये असल्याचं जेरेमी यानी पोलिसांना सांगितलं. त्यासोबतच त्याने सांगितलं की, त्या दोघांमध्ये आयपॅड चार्जरवरुन भांडण सुरु होते.

दरम्यान, पेनेलॉप जॅक्सनचं हे चौथे लग्न होतं. याआधी त्यांनी तीन लग्नं केली होती. मिळालेल्या माहितीनूसार या हत्येमागचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक!

हजारो कोटी चुकून ट्रान्सफर; ‘या’ बँकेच्या चुकीनं भल्याभल्यांची झोप उडाली!

भाजपचं 24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन- चंद्रशेखर बावनकुळे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या