बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् पती पत्नीनं रचला इतिहास; राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच जुळून आला ‘असा’ योग!

जळगाव | नुकत्याच झालेल्या जळगावच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या हातातली सत्ता काढून घेत महापालिकेवर भगवा फडकवला. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी 45 मतं मिळवत महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. तर त्यांचेच पती सुनील महाजन जळगाव महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पती आणि पत्नी, विरोधी पक्षनेते आणि महापौर झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

जळगाव महापालिकेची निवडणूक यावेळी मोठी चर्चेच राहिली. भाजपचे एक दोन नव्हे तर 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या सर्व बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेच्या पारड्यात मतदान केलं. त्यामुळे शिवसेनेला जळगाव महापालिकेवर भगवा फडकवता आला. यात एमआयएमच्या केवळ तीन जागा असल्यानं त्यांना विरोधी पक्षनेते पद देता येत नाही.

भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना अद्याप स्वातंत्र गट स्थापन करता आला नाही. त्यामुळे दुसरीकडे भाजपच्या हातातली सत्ता तर गेलीच त्याचबरोबर विरोधीनेते पद देखील त्यांना मिळवता आलं नाही. 2018 मध्ये भाजपने 75 पैैकी 57 जागा मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. तर यात शिवसेनेला अवघ्या 15 जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, आम्हाला कोणत्या पदाची गरज नाही. शिवसेनेचा महापौर असला तरी आम्ही विरोधातच राहू. चुकीच्या कामाचा आम्ही विरोध करत राहू, असं भाजप गटनेते भगत बालानी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More