बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

नवी दिल्ली | कोरोना संकटाच्या काळात अनेकजण मदत करत माणुसकीचं दर्शन करत आहेत. मात्र काहीजण काळाबाजार करत लोकांची फसवणुक करताना दिसत आहेत. त्यासोबतच कोरोना काळात माणसांचे दोन चेहरे समोर आले. काही गावांनी कोरोना झालेल्या घराला वाळीत टाकल्याच्या घटना समोर आल्या. अशाच प्रकारे बिहारमधील समस्तीपूरमधील अंगार घाटाजवळील खानापूरमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

खानापूर गावातील हरिकांत राय यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना ग्रामस्थांनी बाहेर काढलं. गावातील कोणीही त्यांना मदत करण्याची तयारी दाखवली नाही. त्यांच्या लहान मुलालाही शेजारी आणि नातेवाईकांनी सांभाळण्यास नकार कळवला. अखेर त्यांनी गाव सोडत राय हे आपल्या पत्नीच्या बहिणीकडे गेले. त्यांनीही घरात घेेण्यास नकार कळवला. त्यानंतर राय समस्तीपूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल झाले.

राय यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. राय यांचा मृत्यु झाल्याने रूग्णालयाने त्यांना बॉडी घेऊन जायला सांगितली. राय यांच्या पत्नीने नातेवाईक, शेजारी यांच्याकडे मदत मागितली मात्र सर्वांनी त्यावेळी पाठ फिरवली. 22 तास उलटले तरूही प्रेत नेल नसल्यामुळे रूग्णालयाने राय यांच्या पत्नीवर प्रेत घेऊन जाण्यास दबाव टाकला.

दरम्यान, राय यांच्या पत्नीने शनिवारी सायंकाळी पतीचे प्रेत रुग्णवाहिकेतून दरभंगा गावातील भोगा येथील स्मशानभूमीत आणलं. त्यावेळी कबीर सेवा या संस्थेने त्यांना मदत केली. ही संस्था ज्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे, अशा रुग्णांवर अंत्यसंस्कार करते.  संस्थेकडून त्यांनी मदत मागितली. कबीर सेवा संस्थेने त्यांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य दिलं त्यानंतर राय यांच्या पत्नीने स्वत: पीपीई कीट घालत राय यांना अग्नी दिला.

थोडक्यात बातम्या- 

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”

मला सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास हवाय; तरुणाच्या अर्जाने पोलीस हैराण

‘शरद पवार राज्याचे नेते पण त्यांनी फक्त बारामतीचा विकास केला’; शिवसेना आमदाराची टीका

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More