बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

पुणे | पुण्यातील हडपसर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. माहेरी गेल्यानंतर सासरी येण्यास नकार दिल्या कारणाने नवऱ्याला प्रचंड राग आला. याच रागातून नवऱ्याने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिचा जीव घेतल्याची घटना हडपसर येथील भेकराईनगरमध्ये घडली आहे.

मृत महिलेचं नाव शुभांगी लोखंडे आहे तर आरोपी पतीचं नाव सागर लोखंडे असं आहे. सागर आणि शुभांगी यांचा दुसरा विवाह आहे. शुभांगी सासरी नांदत असताना सागर दारु पिऊन नेहमी तीला त्रास देत होता. ती नेहमी आजारी असल्याने सागरच्या त्रासाला कंटाळून अनेकदा माहेरी रहायला येत होती.

बुधवारी सकाळी ती तिची आई आणि मावशी सोबत कामाला चालली होती. यादरम्यान तीघींना सागरने भेकराईनगर येथील शिवशक्‍तीनगर चौकात आडवलं. तेथे त्याने शुभांगीला सासरी येऊन नांदायला चलायची मागणी केली. मात्र तीने नकार दिल्यावर सागरने अचानक जवळ लपवलेला चाकू काढून तीच्या पोटात खुपसला.

दरम्यान, शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर नागरिकांनी सागरला पकडून चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिलं. मात्र गंभीर जखमी झालेल्या शुभांगीचा जागीच मृत्यू झाला.

थोडक्यात बातम्या-

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला; बेदम मारहाणीमुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ

“आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये”

उदयनराजे म्हणतात, ‘सध्या राज्यात काय राजकारण चाललंय हे मलाच कळेना’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More