पुणे | पुण्यातील कोथरूडमध्ये आज सकाळी एक रानटी गवा फिरत असल्याचं आढळून आलं. कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात हा गवा फिरत होता. रानटी गवा फिरत असल्याची माहिती मिळताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.
सध्या सोशल मिडीयावर देखील या रानटी गव्याचे फोटो आणि व्हिडीयो व्हायरल होतायत. दरम्यान वनविभागाला या गव्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान कोथरूडसारख्या शहरी ठिकाणी रानटी गवा कसा आला हा प्रश्न आता स्थानिकांच्या मनात आहे. वनविभागाच्या पथकाकडून या रानटी गव्याला पकडल्यानंतर या सर्व गोष्टींचा खुलासा होण्यास मदत होईल.
दरम्यान यापूर्वी मुंबईत देखील लॉकडाऊनमध्ये जंगलानजीकच्या भागात प्राणी आणि पक्षी येण्याचं प्रमाण वाढलं होतं.
थोडक्यात बातम्या-
कृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…
कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी
महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“महाविकास आघाडी सरकार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावत एक चांगला निर्णय येईल”