बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पर्यावरणासाठी एक पाऊल! ‘वन्यजीव सप्ताह’ अंधारबन जंगलमध्ये साजरा

पुणे | महाराष्ट्राला पर्यटनाचा खूप मोठा वारसा लाभला आहे. गेल्या काही काळापासून अनेकजण ट्रेकिंगकडे आक्रषित होताना दिसत आहे. अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून गडकिल्ल्यांवर भटकंतीसाठी येत असतात. मात्र ज्याप्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणात पर्यटन स्थळावर कचऱ्याची समस्या देखील वाढत आहे. त्यामुळे माउंटन एज ॲडवेंचर व वाईल्ड ट्रेल्सने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

माउंटन एज ॲडवेंचर व वाईल्ड ट्रेल्स आणि वनविभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव सप्ताहचे’ औचित्य साधून रविवार ताम्हिणी घाटाच्या अंधारबन जंगलातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला व पिंपरी गावात वन्यजीवांविषयी जनजागृती करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माउंटन एज ॲडवेंचरचे 60 सदस्य सहभागी झाले होते. सर्वांनी हिरहिरीने सहभाग घेऊन तीन पोती भरुन प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या व इतर गोष्टी सर्वांनी जमा केल्या. यानंतर पिंपरी गावातील भैरवनाथ समाज मंदिरामध्ये वनविभागाच्या योगिता नायकवडी आणि राठोड यांच्या उपस्थितमध्ये गावातील लोकांसाठी वन्यजीव जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमामधे माउंटन एज ॲडवेंचरचे मंदार थरवल यांनी वन्यजीव व सापांविषयी माहिती दिली व तसेच प्राणिशास्त्र अभ्यासक रोहित नागलगाव यांनी लोकांना ताम्हिणी घाटातील जैवविविधतेबाबत महत्त्व पटवून दिले व निसर्ग संवर्धनाच्या माध्यमातून गावाची सामाजिक आर्थिक वृध्दी कशाप्रकारे होइल, निसर्ग संवर्धन करताना भक्षक न होता रक्षक म्हणून येणाऱ्या काळात गावातील लोकांची भूमिका किती महत्त्वाची असेल याबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, गावकऱ्यांना अंधारबन जंगलाच्या संवर्धनासाठी वनविभागाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल याबद्दल नायकवडी यांनी सांगितलं व कार्यक्रमाचे आभार  राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या सर्व नियोजनासाठी माउंटन एज ॲडवेंचरचे दीपक साने, मनोज राणे, सर्पमित्र संजय निकाळजे व सर्व निसर्गप्रेमी सदस्यानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

थोडक्यात बातम्या-

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More