अजित पवार भाजपसोबत जाणार का?; शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक सदस्य एका विचाराने चालत आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं.

मी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली ही बातमी खोटी आहे. अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या भागातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-