अमृता फडणवीस राजकारणात येणार?, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आपल्या राज्याच्या मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कारण काहीही असो मिसेस उपमुख्यमंत्री मात्र चर्चेचा विषय ठरतात. मग ते कारण त्यांचं गाणं असो किंवा राजकीय घडामोडींवर दिलेली विषेश टिप्पणी.

अमृता फडणवीस राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेल्या राजकीय टीकेच्या, ट्विट्सच्या बातम्या होतात. अमृता फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळींमध्ये शाब्दिक युद्धपण रंगल्याचं पण आपण कितीदातरी पाहिलं.

अमृता फडणवीसांकडे कोणतंही राजकीय पद नसलं तरी त्यांच्या वक्तव्यांची आणि टीकेची नेहमी चर्चा असते. पण आता चर्चा रंगतीये ती अमृता फडणवीसांच्या राजकारणातल्या एंट्रीची.. आणि ही फक्त चर्चा नाही बरंका पण याचे स्पष्ट संकेत खुद्द मिसेस फडणवीसांनीच दिलेत.

अमृता फडणवीसांच्या जळजळीत ट्विटमुळे अनेकदा राजकारण चांगलंच पेटलं. विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणं, राजकीयच नाही पण सामाजिक विषयांवर पण अमृता फडणवीस भाष्य करतात.

मिसेस उपमुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीसांची पत्नी एवढीच अमृता फडणवीसांची ओळख नाही. तर त्यांनी गायिका म्हणून एक वेगळी ओळख आणि त्यांचा चाहतावर्ग तयार केलाय. एवढंच नाही पण गेल्या 17 वर्षांपासून अमृता फडणवीस axis bank सोबत जोडलेल्या आहेत. अगदी 2014 झाली जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांनी त्यांची axis बँकेतली नोकरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आज अमृता फडणवीस axis बँकेत उपाध्याक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही वेगळी ओळख असली तरी त्यांची राजकारणाची आवड काही लपून नाही. त्यातच त्यांच्या सक्रिय राजकारणातील एंट्रीची चर्चा जोर धरतीये.

या चर्चेमागचं कारण असं की अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या राजकारणातल्या एंट्रीबद्दल एक सूचक वक्तव्य केलंय. अमृता फडणवीसांच्या मते राजकारण ही पूर्णवेळ देऊन काम करण्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी राजकारणासाठी पूर्णवेळ देऊ शकेन तेव्हाच मी राजकारणात येईल, असं अमृता फडणवीस वृत्तपत्राशी बोलताना म्हणाल्या.

आता कुठला कार्यक्रम असो किंवा सोशल मीडिया, अमृता फडणवीस चौफेर मुद्द्यांवर व्यक्त होत असतात. सोबतच त्यांची राजकीय टिप्पणही अनेकदा चर्चेचा विषय ठरते. त्यात त्यांनी राजकारणातील एंट्रीबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा रंगतीये.

केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बायको अशी ओळख न ठेवता अमृता फडणवीसांनी बँकर आणि गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण आता या सगळ्यानंतर मिसेस उपमुख्यमंत्री खरंच राजकारणात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

अमृता फडणवीसांकडे सध्यातरी कोणतं राजकीय पद नाही पण त्यांनी पुर्णवेळ सक्रीय राजकारणात प्रवेश केला तर भाजपला याचा काही फायदा होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-