बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

मुंबई | क्रुझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. गुरूवारी उच्च न्यायालयाने आर्यन खानला  काही अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. परंतु, आर्यन खानची कारागृहातून सुटका कधी होणार याबाबत स्पष्टता नव्हती. आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? यावर आर्यनचे वकिल मानेशिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

उच्च न्यायालयाकडून आज सायंकाळी जामिनाचा आदेश आम्हाला अपेक्षित आहे. हा आदेश आम्हाला मिळाल्यानंतर विशेेष एनडीपीएस न्यायालयात सादर केला जाईल. विशेष न्यायालयातील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आर्यनच्या सुटकेचा आदेश आम्हाला मिळेल. त्यामुळे आर्यनची आजच सुटका होणे अपेक्षित आहे, असं सतीष मानेशिंदे यांनी सांगितलं आहे.

आर्यन खान सोबतच मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचा  देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडून 3 वाजल्यानंतर जामीनाचा अर्ज मिळणे आवश्यक आहे. जास्तीचा वेळ लागला तर 4:30 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व कागदपत्रांची पुर्तता करून कारागृह प्रशासनाकडे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या कारणामुळे शुक्रवारीच सुटका होईलं, असं वकिल काशिफ खान यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुरूवारी आर्यन खानच्या जामिनाचं वृत्त आल्यानंतर शाहरुख खानच्या निवासस्थानी मोठा जल्लोष करण्यात आला होता. जामीनाचा अर्ज शुक्रवारी मिळणार असल्याने आर्यन खानची आर्थर तुरूंगातून सुटका होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, मी साधी सिगारेट देखील ओढत नाही”

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More