बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आषाढी वारीवर निर्बंध येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने यापुर्वी यंदाची आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर्षीच्या आषाढीवारी संदर्भात वक्तव्य केलं आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडसह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. राज्यात मास्कसक्ती नसली तरी आम्ही मास्क घालण्याचा आग्रह करत आहोत, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच आषाढी वारीसंदर्भात चर्चा झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

आषाढी वारी संदर्भातील नियोजन आता पुढे गेलेलं आहे. लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे  आता मागे वळून चालणार नाही. यंदाची वारी कोरोना निर्बंधमुक्त असणार आहे. परंतु, सर्वांनी काळजी घ्यायची आहे, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे.

दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानाचे पुर्ण नियोजन करण्यात आले आहे. तसेच यंदा वारीमध्ये दरवर्षीपेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडून देखील जोरदार तयारी करण्यात येत आहे. पालखी मार्गात वेगवेगळ्या सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने जागतिक स्तरावर भारताचं स्थान खराब झालं-राहुल गांधी

“भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते”; सदाभाऊ  खोत संतापले

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More