मुंबई | कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे 8 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे 12 हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.
गोरेगाव येथे 2600 खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 खाटांची उभारणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ मुलुंड येथे 2 हजार खाटा, दहिसर येथे 2 हजार आणि भायखळा येथे 2 हजार खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातम्या-
3 टप्प्यात खुले होणार व्यवहार; कोणत्या टप्प्यात काय आणि कधी सुरु होणार? वाचा…
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?
महत्वाच्या बातम्या-
मलेरिया, डेंग्युला आळा घालण्यासाठी ‘हे’ काम हाती घ्या- आरोग्यमंत्री राजेश टोपे
अभिनेता सोनू सूद राज्यपालांच्या भेटीला, वाचा भेठीपाठीमागचं कारण…
देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रात, पत्रात म्हणतात…
Comments are closed.