बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई महापालिकेत ‘भाजप मनसेला टाळी’ देणार का? ; आशिष शेलार यांचं स्पष्ट उत्तर

मुंबई | येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूका लागणार आहेत. त्याआधीच आता सर्वच पक्ष या निवडणुकीवर डोळा लावून बसले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादात मागील मुंबई महापालिकेच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी मनसेने मराठी माणसाच्या मुद्यावरून शिवसेनेला टाळी मागितली होती. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर आता मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आशिष शेलार सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी मुंबई महापालिकेत मनसे भाजप युती होणार का? असा सवाल त्यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी स्पष्ट ‘नाही’ असं उत्तर दिलं. मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येतील, अशी चर्चा रंगली आहे. पण आता मनसेसोबत युती करणार नसल्याचं उत्तर शेलार यांनी सांगितलं आहे.

मनसेने मराठी माणसाच्या मुद्द्यासोबत हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलं आहे. आणखी काही बाबतीत मनसेची मतं आमच्याशी जुळली तर आम्ही नक्कीच वेगळा विचार करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काही दिवसांपुर्वी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्यावरून बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेना आपल्या आघाडीच्या मित्रपक्षासोबत मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. पण नाना पटोलेच्या बदलत्या सुरानंतर काँग्रेसला आघाडीतून डावललं जाईल का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यातच आता भाजप मनसेला सोबत घेण्याचा शेवटचा प्रयत्न करू शकते. नाहीतर आघाडी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत मुंबई महापालिकेच्या निवडणूकांमध्ये पाहायला मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

सकारात्मक बातमी! ‘या’ राज्यात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

भाजपला मोठा धक्का! आत्तापर्यंत 105 मुंडे समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More