बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आता गुन्हेगारांच्या जोरावर निवडणूक लढवणार का?”

पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी काही स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘या पक्ष प्रवेशाच्या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबरच इतर अनेक पदाधिकारी तिथून बाजूला झाले. याआधी देखील सप्टेंबर महिन्यात तडीपार गुंड दीपक गागडे आणि नाना मोघे यांच्यासोबत चंद्रकांत पाटलांचे कार्यक्रमांमधील फोटो समोर आले होते’, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

चंद्रकात पाटील कोथरुड सारख्या सुशिक्षित लोकांच्या भागात गुन्हेगारांना जाहीर प्रवेश देत आहेत, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, असंही जगताप म्हणाले. गुन्हेगारांना प्रवेश देऊन पुण्याची संस्कृती बिघडवत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला आहे. त्यामुळे, भाजप आता गुन्हेगारांच्या जोरावर आगामी महापालिका निवडणूक लढवणार आहे का?, असा सवाल जगताप यांनी केला.

पुणे सुसंस्कृत शहर आहे, त्याचे वातावरण बिघडवू नका असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश करत असताना एकाही गुन्हेगाराला राष्ट्रवादीत गुन्हेगाराला प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलं आहे.

दरम्यान, लोकांचा विश्वास संपादन करून ही निवडणूक जिंकू असे प्रतिपादनही जगताप यांनी केलं. पुण्यातील गुंडगिरी मोडून काढू असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण आता त्यांचेच प्रदेशाध्यक्ष गुंडागिरीला बळ देत आहेत, अशी खोचक टीका जगताप यांनी केली.

थोेडक्यात बातम्या-

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

“आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय”

गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर

“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”

“राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More