देश

“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने तीन कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. मात्र आता आम्ही जिओ सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे

उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय.

मोठमोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना आज प्रस्ताव पाठवला होता. मात्र, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

थोडक्यात बातम्या-

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता मिळणार ‘ही’ शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

“भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित”

‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण!

‘कृषी कायदा रद्द करा’; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आहे- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या