मुंबई | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी यासाठी पुन्हा एकदा भाजप आमदार राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
यापूर्वी अर्णब यांच्या सुटकेच्या मागणीसाठी राम कदम यांनी उपोषण केलं होतं. तर आता याच मागणीसाठी ते थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत.
शिवाय राम कदम त्यांच्या घाटकोपरमधील निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार आहेत. तसंच अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असं राम कदम यांनी सांगितलं आहे.
राम कदम म्हणाले, “अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची असून आम्ही याचा विरोध करतोय. या अटकेचा सर्वच स्तरातून विरोध होतोय. त्यामुळे ज्या दिवशी अर्णब यांची सुटका होईल, त्याच दिवशी आम्ही दिवाळी साजरी करू”
महत्त्वाच्या बातम्या-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याची धमकी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी!
विजयानंतर जो बायडेन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन, म्हणाले…
महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; अण्णा हजारेंची टीका
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…