Top News देश

बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?

पटणा | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. मतमोजणीचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणित एनडीएने जोरदार कमबॅक केले आहे. एनडीए जवळपास 100 जागांवर पोहचली आहे. ही परिस्थीती कायम राहिल्यास अपक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांना सोडून सत्ता स्थापन करण्याची संधी एनडीएला मिळू शकते.

अशावेळी लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांची भूमिका महत्वाची ठरु शकते. सध्या पासवान यांचा पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांनी या जागा जिंकल्यास ते खरोखरच बिहारचे किंगमेकर ठरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार,असे चित्र होते. मात्र  महागठबंधन आणि एनडीए यांच्या संख्याबळात फारसा फरक राहिलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

मतमोजणीला सुरुवात; कोणाच्या डोक्यावर चढणार मुख्यमंत्री पदाचा मुकुट?

बिहार निवडणूक निकाल- प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या