बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, नाना पटोले स्पष्टच बोलले

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केल्याने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप देखील नाना पटोलेंनी केला होता.

नाना पटोलेंनी केलेला आरोप हस्यास्पद असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. अजित पवारांच्या प्रतिक्रियेवरून नाना पटोलेंनी आणखी एकदा राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलं आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि तो आम्ही पाळला. मात्र, भाजपला वाढवण्यासाठी राष्ट्रवादी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही विरोध करतो, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुकात हायकमांड योग्य निर्णय करेल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

थोडक्यात बातम्या-

हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणं; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, म्हणाले ‘येणाऱ्या काळात…’

‘तिला मानलं पाहिजे’; सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन?

मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ

खळबळजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More