मुंबई | राज्यातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात दिवाळीची सुट्टी देणार असून त्या संबंधीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी राहून दिवाळीचा साजरी करता येणार आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या दिवसात तरी ऑनलाईन शिक्षणापासून सुट्टी मिळणार आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळ सणाची सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही दिवाळी टेन्शन फ्री साजरी करता येणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या काळात कोणत्याही परिक्षांचे नियोजन करू नका, असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘हिसाब होगा… इंटरेस्ट लगाके’; अर्णब यांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा राज्य सरकारला अप्रत्यक्ष इशारा
अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून अमित शहांची महाविकासआघाडीवर टीका म्हणाले…
‘अल्प बुद्धी दिसतेच आहे’; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर
“मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र उधळून लावूया”
स्मृती इराणींसाठी मोदी सरकारने मोडला कायदा; राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती परस्पर केली रद्द!