महाराष्ट्र मुंबई

3 मे नंतर लॉकडाउनचं काय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | 3 मे नंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याविषयी सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे. याच मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

ग्रामीण भागात आपण जिल्ह्यांच्या वेशी उघडणार नाही. पण, जिल्हातंर्गत काही उद्योग आणि इतर व्यवहारांना आपण सुरूवात केली आहे. त्याचा दररोजचा अहवाल माझ्याकडे येत आहे. आज संध्याकाळी पुन्हा सगळ्याचा आढावा मी घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

3 मे नंतर काय करायचं, आणखी किती मूभा देता येईल. मोकळीक देता येईल याचा निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकारच्या भविष्यातील नियोजनाची कल्पना देऊ शकतात.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

महत्वाच्या बातम्या-

‘महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या’; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?- आशिष शेलार

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या