बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका रेमडेसिवीरची किंमत ऐकून हैराण व्हाल, पुणे गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

पुणे | कोरोनाने देशात सगळ्यांना हैराण केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशातील रुग्णसंख्या तसेच मृत संख्या वाढली आहे. अशातच लसीकरण देखील चालू करण्यात आलं आहे. मात्र बेड्स आणि सेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक आरोपी रेमडेसिवीरचा काळा बाजार करत असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान पुण्यातील चौघांना रेमडेसिवीरबाबत काळा बाजार करण्यावरुन अटक करण्यात आली आहे.

खडकी बसस्टाॅपकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जण रेमडेसिवीर इंजेक्शन 37 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी एक पथक तयार केलं. या पथकाने गुरुद्वारा परिसरात बनावट ग्राहक तयार करुन इंजेक्शन देणाऱ्या महिला आरोपीला ताब्यात घेऊन तिच्याकडचे इंजेक्शन जप्त केलं. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये या प्रकरणात आणखी तीन जणांचे नाव समोर आलं.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपीचं नाव निकीता गोपाळ ताले असं आहे. निकीता ही 25 वर्षांची आहे. तसेच संबंधित प्रकरणात समोर आलेल्या तीन जणांचे नाव राहुल बाळासाहेब वाळुंज , रोहन बाळासाहेब वाळुंज आणि प्रतीक गजानन भोर असं आहेत. यातील राहुल आणि रोहन हे दोघे भाऊ असून राहुलचं वय 27 तर रोहनचं वय केवळ 20 वर्ष आहे. तसेच प्रतीकचं वय 26 वर्ष आहे.

दरम्यान, संबंधित सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडचे इंजेक्शन देखील जप्त करण्यात आले आहे. रेमडेसिवीर काळा बाजारात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकूण 11 जाणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांबाबत पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

पुण्यात बनणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत परदेशात कमी पण भारतात सर्वाधिक!

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More