नवी दिल्ली | कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडाले, तर मुलांच्या शाळा, महाविद्यालये बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. आता कोरोनास्थिती सुधारत असली तरी शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. त्यामुळे लहान मुलांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलांच्या मानसिक, शारिरीक आणि शिकण्याच्या क्षमतेवर येत्या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात प्रभाव राहणार आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सर्व मोठ्या व्यक्तींच्या लसीकरणासोबतच देशांनी शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यायला हवं, असं मत सौम्या स्वामिनाथन यांनी मांडलं आहे. एकत्र जमा होण्यावर आणि सातत्यानं हात साफ करण्यासारख्या पर्यायांचा देखील वापर करण्यात यायला हवा, असंही स्वामिनाथन म्हणाल्या.
काही दिवसांपुर्वी देखील त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाळा सुरू करण्यावर भर द्यावा, असं म्हटलं होतं. गरिब मुलांना गेल्या 2 वर्षापासून शिक्षण मिळालेलं नाही. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही. त्यामुळे सरकारांनी ऑफलाईन शिक्षण देण्यास भर द्यायला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, देशात विविध राज्यांनी आता शाळा सुरू केली आहे. पंजाबमध्ये शाळा सुरू केल्यानंतर काही दिवसातच 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात देखील काही भागात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार
शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ
“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”
“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
Comments are closed.