मुंबई | चित्रपटांमध्ये खलनायकाची पात्र साकारणारा अभिनेता सोनू सूद मात्र खऱ्या जीवनात लॉकडाऊनच्या काळापासून एका नायकाप्रमाणे दिसला आहे. गरजूंना मदत असो मग एखाद्या शेतकऱ्याला सोनू त्याच्या पद्धतीने मदत करत आहे. त्यामुळे सोनू नेहमी आपल्या मदतकार्याने चर्चेत असतो.
काही दिवसांपासून सोनू राजकारणात येणार का?, असा सवाल वारंवार त्याला केला जातो. यावर सोनू सूदने मोकळ्या मनाने एका मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जर राजकारणात मला एखादी जबाबदारी देण्यात आली आणि मी माझ्या इतर कामांमुळे लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर त्याचा काय उपयोग?, असं म्हणत सोनूने सांगितलं की, मला एक अभिनेता म्हणून खूप काही करायचं आहे.
दरम्यान, बॉलिवूडमध्ये येण्याआधी माझी काही स्वप्न होतीत. त्यातली काही पूर्ण झाली आहेत तर काही बाकी आहेत. त्यामुळे ती राहिलेली स्वप्न पुर्ण करायची असल्याचं सोनू म्हणाला.
थोडक्यात बातम्या-
कंगणा-उर्मिलाच्या वादात रोहित पवारांची उडी; ‘महाराष्ट्रद्रोही भाजपचा….’
नागपूरवाले मला म्यूट का करतात?; उद्धव ठाकरेंचा सवाल
‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोल
“आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू”
…म्हणून मी या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय घेतला- शिवराज सिंह चौहान
हाडे गोठवणाऱ्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू