बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुसरं लग्न करणार का?, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली

मुंबई | झी मराठी वरील ‘खुलता कळी खुळेना’ या मालिकेतील मानसीच्या भूमिकेनं अभिनेत्री मयुरी देशमुखनं सगळ्यांनाच भूरळ घातली होती. आता मयुरीनं हिंदी मालिकेतही पदार्पण केलं आहे. सध्या स्टार प्लस वरील ‘इमली’ या मालिकेत ती काम करत आहे.

मयुरीच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं. ती तिच्या आयुष्यात यशाची शिखरं गाठत होती. मालिकेनंतर तिनं काही नाटकांत काम केलं होतं आणि ती यशस्वी देखील ठरली होती. 2016 ला तिनं अभिनेता आशुतोष भाकरे याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, आशुतोषनं मागील वर्षी जुलै 2020 मध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनं मयुरीला मोठा धक्का बसला होता.

मागील वर्ष 2020 माझ्यासाठी, माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय कठीण होतं. आशुतोष आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याचं जाण्याचं दुःख हे आभाळ कोसळण्यासारखंच होतं. पण यातून सावरणं गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला मदत केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, असं एका मुलाखती दरम्यान मयुरीनं सांगितलं आहे.

दरम्यान, माझं आजही आशुतोषवर मनापासून प्रेम आहे, आजही तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होत. आशुतोषला लहान मुल खूप आवडायची. त्यामुळे आता तो गेल्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. अनेकदा मला दुसरं लग्न करण्याबाबत सतत विचारलं जातं. परंतु मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?, असं मयुरी यावेळी म्हणाली.

थोडक्यात बातम्या

प्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप

तलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली!

पुण्यात महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

आज 4 वाजल्यानंतर हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही कोरोनावरील लस!

विराट कोहलीला मोठा दिलासा, रोहित शर्मानं उधारीवर दिला आपला ‘हा’ खेळाडू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More