बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण!

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. या लसींचे डोस घेतले जातात त्यातील पहिल्या डोसमधील आणि दुसऱ्या डोसमधील अंतर हे वाढवणार असल्याची माहिती समजत आहे. सरकारच्या विशेषतज्ज्ञांचं एक पॅनल ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवण्याच्या विचारात आहेत.

कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन डोस सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ 55.1 टक्केच होतो.

दोन्ही डोसध्ये ठेवण्यात येणाऱ्या अंतरामुळे प्रतिकारशक्ती वाढते. कंपनीनेही असा दावा केला आहे, की लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास त्याचा प्रभाव 28 टक्क्यांनी वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. इतर देशातही दोन डोसमध्ये बऱ्याच कालावधीचं अंतर आहे. यात ब्रिटनमध्ये हे दोन्ही डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं दिले जात आहेत. तर कॅनडामध्ये अंतर 16 आठवड्यांचं आहे.

दरम्यान, दोन डोसमधील अंतर वाढवल्याने लसीच्या पुरवठा साखळीवरील दबावही कमी होण्यास मदत होईल. या गोष्टीचा लसीकरणाच्या नव्या टप्प्यात फायदा होईल, तसंही आता 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे मात्र लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे काहींना अजुनही लस मिळालेली नाही.

थोडक्यात बातम्या- 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू!

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

पुण्यातील लॉकडाउनबाब अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं, तेही आघाडीला टिकवता आलं नाही”

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More