बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी; कोकणातही पाऊस परतणार?

पुणे | मागील आठवड्यामध्ये कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून हा पाऊस दडी मारून बसला आहे. दडी मारुन बसलेला हा पाऊस परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या तीन चार तासांमध्ये पुण्यासह राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्यानं पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन चार तासांमध्ये या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यासह राज्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच अरबी समुद्रावर देखील आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांध्ये येत्या तीन चार तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासून महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी वातावरणात गारवा वाढला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात कोकणात मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर गेल्या तीन चार दिवसांपासून ओसरला आहे. मात्र, आज हवामान खात्याने कोकणाला दिलेल्या यलो अलर्टनुसार पाऊस पुन्हा कोकणात थैमान घालण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

फुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

CBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More