जान्हवी कपूर होणार ‘या’ बड्या राजकीय नेत्याची सून?

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळं तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळं. त्यातच जान्हवी आता माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजे शिखर पहाडिया(Shikhar Pahariya) डेट करत आहेत, अशा चर्चा आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे एकत्र दिसत आहेत.

नुकताच शिखर आणि जान्हवीचा अनंत अंबानीच्या साखरपुड्यातला एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जान्हवी कार्यक्रमात येताच शिखारसोबत गप्पा मारण्यात दंग झाल्याचे दिसत आहे.

यापूर्वीही जान्हवी आणि शिखर अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले होते. आता या सगळ्यावरून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज नेटकरी लावत आहेत.

महत्वाच्या बातम्या-