Top News देश

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

नवी दिल्ली | कोरोनावरील लशीच्या बाबतीत होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत ऑफ्सफर्ड अॅस्ट्राझेनकाच्या कोविशील्ड लशीला देशात तात्काळ मंजुरी देण्याचा निर्णय होऊ शकतो.

लस देण्याच्या मोहिमेचे संपूर्ण नियोजन तयार आहे. भारत जगातील सर्वात मोठी लस मोहीम राबवणारा देश ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशातील प्रत्येक राज्यात उद्या 2 जानेवारीपासून ‘ड्राय रन’ करण्यात येणार आहे. यासाठीच्या तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत एका बैठकीत घेण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या घेण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

“काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का, असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला?”

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या