बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढू लागली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत देखील पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतं, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी आज दिले आहेत. आज एका वृत्त वाहिणीशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत.

यावेळी असलम शेख म्हणाले की, राज्य सरकारला मुंबईमध्ये लॉकडाऊन नकोय. मात्र, नाईलाजाने पुन्हा एकदा काही कठोर पाऊले उचलत निर्णय घ्यावे लागतील. मुंबईमध्ये सुरुवातीला थोडी शिथिलता देण्यात आली होती. यानंतर पुन्हा निर्बंध लादण्यात आले.

आता पुन्हा एकदा मुंबईत काही बाबतीत शिथिलता आणण्याबाबत एक टास्क फोर्स आणि सरकार विचार करत आहेत. प्रवाशांबद्दल अनेक महत्वाचे निर्णय, दुकानांच्या वेळा, इत्यादी गोष्टी टास्क फोर्सच्या विचाराधीन आहेत. लवकरंच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती असलम शेख यांनी दिली आहे.

दरम्यान, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत यावर बोलणे योग्य नाही. मात्र, निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं देखील यावेळी असलम शेख यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

वडेट्टीवार चंद्रपूरमधील बार-मालकांसाठी बनले ‘देवमाणूस’; दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

“मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा मोदींचा अधिकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More