बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं सगळीकडे थैमान मांडलेलं असताना कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच महाराष्ट्र मासमुक्त होणार का? यावर सध्या चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.

राज्य लवकरच मासमुक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्य मास्कमुक्त होणार हा गैरसमज काढून टाकावा. आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल तर आतापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.

आपण आत्तापर्यंत सगळे निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहे. तज्ज्ञांच्या म्हण्यानुसार, पॅन्डेमिक संपलेलं नाही. त्यामुळे सगळ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ओमिक्राॅननं सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना व्हायरसच्या यापूर्वीच्या व्हेरियंटंपेक्षा ओमिक्रॉन व्हेरियंट जास्त काळ जीवंत राहत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘भाजप फ्लॉवर नाही तर फायर आहे’; पुष्पाचा डायलॉग ट्विट करत चित्रा वाघ यांची फटकेबाजी

“खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करा”

Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर

“‘मद्य’राष्ट्र बनविण्यसाठी नेमकी कोणाशी डील झाली?”; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

नवजोत सिंह सिंद्धूच्या अडचणी वाढल्या, बहिणीनेच केले ‘हे’ गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More