बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबईतील क्रुझ पार्टीवर टाकण्यात आलेल्या कथित धाडीत आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. अशातच प्रभाकर साईल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नियम हा सर्वांसाठी सारखाच असायला हवा. तो मंत्री सुशांतसिंगच्या सर्वात जवळचा होता. आता त्याचा या प्रकरणाचा काही संबंध नाही, असं म्हणता येणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सुशांतसिंग राजपूतबद्दल सर्व काही कबूल केलं गेलं आणि दिशा सालियनने त्याला मागे हटण्यास सांगितले. माझ्याकडे याचे ध्वनी रेकॉर्डिंग आहे आणि मी ते सार्वजनिक करू शकतो, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, गणेश हिवरकर ज्यांनी माझ्यासमोर कबुली दिली आणि आमदार मित्र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल असताना ‘युवा’ महाविकास आघाडीच्या मंत्र्याने धमकी दिली आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे आता नितेश राणे यांचा इशारा थेट आदित्य ठाकरे यांच्यावर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“जातीचा बोगस दाखला दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली”

इंग्लंडचा तारणहार आला! ‘या’ धाकड खेळाडूचं लवकरच संघात पुनरागमन

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात कायद्याचा धाक होता, तेव्हा…”

“भाजप व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस प्रभावी”

‘मी आणि समीर दोघेही हिंदू आणि आम्ही…’; क्रांती रेडकरचं मलिकांना प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More