पुणे महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…

पुणे | “उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”, अशा शब्दांत मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यावर पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार म्हणाले आहेत की, “मला असं वाटतं की मावळमध्ये मला पहिले 2 वर्ष काम करायला पाहिजे. तिथल्या लोकांना भेटून लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत, असं पार्थ पवार यांनी सांगितलं आहे.

पण तुम्ही ‘आताच या’ असा लोकांचा आग्रह आहे. मी जर उभा राहिलो आणि सर्वजण एकत्र येत असतील तर काही हरकत नाही, असं म्हणत त्यांनी आपण लोकसभेच्या निवडणुकीत अजूनही शर्यतीत आहोत असेच संकेत दिले.

दरम्यान, मावळ मतदारसंघात पार्थ पवार आला किंवा कोणता दुसरा पवार आला तरी मला फरक पडणार नाही, असं शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”

उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग

युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??

‘मास्तर धोनी’ चक्क मराठीतून मार्गदर्शन करतो तेव्हा…!

-तीन चार रुपयांमध्ये हॉटेलात कपभर चहा मिळतो का? -शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या