बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चुकीची माहिती दिली म्हणून पत्रकाराला अटक केली, आता मंत्र्यांना अटक होणार का?”

मुंबई | राज्याच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी एसटीने पुढाकार घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती, मात्र काही तासातच त्यांनी आपला निर्णय मागे घेतल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

चुकीची माहिती दिल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानकात गर्दी झाल्याचा ठपका ठेवत सरकारनं एबीपी माझाचे रिपोर्टर राहुल कुलकर्णी यांना अटक केली. आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे एसटी डेपोबाहेर गर्दी झाली. आता ही माहिती देणाऱ्या अनिल परब यांना अटक होणार का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

नागरिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारने ११ मेपासून एसटीच्या मोफत सेवेची घोषणा केली होती. त्यानुसार, सोमवारी राज्यातील विविध भागांत अडकलेले विद्यार्थी, मजूर, नागरिकांनी प्रत्येक एसटी आगाराबाहेर गर्दी केली.

मुंबई सेंट्रल येथील आगाराबाहेरही प्रचंड गर्दी झाली होती. अखेर ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. परळ आगाराबाहेर देखील अशीच गर्दी झाली होती, मात्र राज्य सरकारने आपली घोषणा मागं घेतल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळाला.

ट्रेंडिंग बातम्या-

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत, मात्र….

गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही

80 वर्षांच्या आजी-आजोबांनी केलं असं काही वाचून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More